Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोनाचा उगम चीन देशातल्या वुहानच्या प्रयोग शाळेतूनच

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. २४ मे : कोरोनाने गेल्या दीड वर्षांपासून जगभरात थैमान घातला असून त्याचा जनक नेमका कोण आहे याबाबत अद्यापही वाद सुरू आहे. चीनमधूनच कोरोनाचा फैलाव झाल्याचा अनेक देशांचा आरोप असून चीनकडून हे आरोप फेटाळण्यात आले, मात्र आता एक नवी माहिती समोर आली आहे, ज्यानुसार वुहानच्या ज्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा फैलाव झाल्याचा दावा केला जात आहे. तेथील तीन कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. असे वॉल स्ट्रीट जर्नलमधील रिपोर्टच्या आधारे एका वृत्तपत्राने म्हटले आहे.

डब्लूएचओच्या तपासात मदत मिळेल

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, चीनने जगासमोर कोरोनाची माहिती जाहीर करण्याआधी नोव्हेंबर २०१९ मध्ये वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (WIV) तीन कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रिपोर्टनुसार तिन्ही कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनासारखी लक्षणे होती. यामध्ये अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या रिपोर्टचा उल्लेख करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१९ नंतरच डिसेंबर-जानेवारी दरम्यान जगाला कोरोना महामारीची माहिती मिळाली होती. वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टमध्ये नेमक्या किती संशोधकांना लागण झाली, त्याची वेळ, त्यांच्या रुग्णालयातील कालावधी यांची माहिती देण्यात आली असून यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या तपासात मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.

कोरोनाचा फैलाव नेमका कुठून झाला यासंबंधी जागतिक आरोग्य संघटना तपास करीत आहे. यासाठी त्यांचे एक पथक वुहानमध्येही गेले होते. जागतिक आरोग्य संघटना तपासातील पुढचा टप्पा निश्चित करत असतानाच ही माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र बायडन प्रशासन अद्यापही कोरोनाच्या पहिल्या दिवसांच्या बाबतीत चिंतीत असून अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचे सांगितले आहे. यामध्ये चीनमधून कोरोनाचा फैलाव झाल्याचाही उल्लेख आहे. वॉशिंग्टनमधील चिनी दुतावासाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रविवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने फेब्रुवारी महिन्यात केलेल्या दौऱ्यात वुहानमधील प्रयोगशाळेतून संसर्ग झाल्याची शक्यता नाकारली होती याकडे लक्ष वेधले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

दिलासादायक! भारतात लहान मुलांवरील ‘या’ महिन्यापासून कोव्हॅक्सिन लसीच्या ट्रायलला सुरुवात

ब्लॅक फंगसचा धोका नेमका कोणत्या रुग्णांना?

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.