Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तीन हजार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी पुकारला संप

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) परिसरात डॉक्टरांनी एकत्र येवून केला संप.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. ४ मे: नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) परिसरात डॉक्टरांनी एकत्र येवून संप पुकारला आहे. संप करणारे डॉक्टर २०१६ च्या बॅचचे आहेत. महाराष्ट्रातील तीन हजार डॉक्टरांनी संपाचा निर्णय घेतल्याने रुग्ण सेवेला फटका बसला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोविड-१९ ड्युटी करणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबई व पुण्याच्या इंटरला मागील वर्षी दिल्याप्रमाणे ५०,००० मानधन राज्यातील सर्व डॉक्टरांना मंजूर करावे, त्यांना दिल्याप्रमाणे ३०० रू प्रति दिवस जेवण, प्रवास प्रोत्साहन भत्ता सर्वांना मंजूर करावा, कोविड ड्युटी नंतर विलगिकरण सुविधा द्यावी. त्याकाळात आजारी पडल्यास उपचाराची जबाबदारी शासनाने उचलावी, शासनाने विमा कवच प्रदान करावे, नर्सेस विद्यार्थ्याना शासन १००० रुपये दिवस भत्ता देत असून महाराष्ट्रातील डॉक्टरांना सद्य:स्थितीला कोणताही भत्ता न मिळता केवळ तुटपुंज्या विद्यावेतनावर काम करावे लागत आहे. त्या अनुषंगाने अधिष्ठाता यांना डॉक्टरांनी निवेदन दिले आहे. नागपूर महापालिकेचे आयुक्त व जिल्हाधिकारी यांना डॉक्टरांनी सप्टेंबर २०२० मध्येच निवेदन दिले होते. त्यावर काही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता हे डॉक्टर संपावर गेले आहेत.

Comments are closed.