Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिग्दर्शक ‘प्रिन्स’ राजीव कपूर यांचं वयाच्या 58 व्या वर्षी निधन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क दि.९ फेब्रुवारी :- अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि कपूर कुटुंबातील सर्वात महत्त्वाचे सदस्य असणारे राजीव कपूर यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्य झटक्यानं त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. राजीव कपूर हे रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर यांचे लहान बंधू आहेत.

वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे .दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे ते लहान भाऊ होते.आज दुपारी त्यांना हृदय विकारचा झटका आला.त्यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी त्यांना तात्काळ चेंबूर येथील इनल्याक रुग्णालयात उपचारासाठी हलविले मात्र उलचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.गेल्या वर्षी ऋषी कपूर यांचे निधन आणि आता राजीव कपूर यांच्या जाण्याने कपूर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.हृदयविकाराचा झटका आल्यानतंर त्यांना चेंबूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु तोपर्यंत त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.