Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदर पुनावाला यांना फोन करण्याची माहिती आमच्याकडे; भाजपचे आ. आशिष शेलार यांचा दावा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, ३ मे : ‘सीरम संस्थेचे आदर पुनावाला यांना कोणी कोणी फोन केले याची माहिती आमच्याकडे आहे. कोरोनाची परिस्थिती निवळल्यावर ज्यांनी त्याना फोन केला त्यांची खैर नाही’ असा दावाच भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

आदर पुनवाला यांनी आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणीवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

‘आदर पुनावाला यांना सुरक्षा का मागावशी वाटली? त्यांचा इशारा स्थानिक पार्टीकडे केलं का? आदर पुनवाला यांना कोणी कोणी फोन केले याची माहिती आमच्याकडे आहे. कोरोनाची परिस्थिती निवळल्यावर ज्यांनी त्यांना फोन केला त्यांची खैर नाही’ असा इशाराच शेलार यांनी दिला.

पश्चिम बंगाल निवडणूक चर्चा अजून काही दिवस चालेल. आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. पण ममता बॅनर्जी यांना पराभूत करू शकलो नाही हे सत्य आहे. पण यशाचं मोजमाप करायचं तर भाजप आहे. कम्युनिस्ट आणि काँग्रेस रसातळाला गेलं. भाजप 3 वरून आताची संख्या गाठली. छुपे आडवे आणि डावे हात कोणाचे होते ते पाहावे लागेल काँग्रेस ला भुईसपाट करण्याचं काम या अदृष्य हाताने केलं का?’ असा टोला शेलार यांनी लगावला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

‘पंढरपूर निकाल भाजपच्या बाजूने लागला आहे. पण इथं आपलं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचे पाहायचं वाकून अशी स्थिती झाली आहे. पंढरपूर निकालानंतर अजित पवार यांनी राजीनामा द्यावा हे नवाब मलिक बोलणार का?’, असा टोलाही शेलार यांनी राऊत यांना लगावला.

‘संजय राऊत आणि शिवसेनेनं बंगालवर बोलण्याची औकात नाही. जे दुसऱ्यांच्या कुबड्यावर उभे आहेत, त्यांनी ही भाषा वापरू नये’, असा कडक इशाराच आशिष शेलार यांनी सेनेला दिला आहे.

याला पुनावाला स्वतः जबाबदार – नवाब मलिक

दरम्यान, ‘केंद्राला १५० रुपये, राज्याला आधी ४०० आणि नंतर ३०० रुपये तर खाजगी हॉस्पीटलसाठी ७०० रूपये लस देण्याचे पुनावाला यांनी जाहीर केले. हा सगळा संशय निर्माण करणारा विषय असून याला पुनावाला स्वतः जबाबदार आहेत त्यांना कोण बदनाम करत नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.