Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अभिजित कुडे यांचा सामाजिक कार्यासाठी खैरे कुणबी समाज संघटना बुटीबोरी द्वारा सत्कार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वरोरा 25 जानेवारी:- वरोरा तालुक्यातील एका छोट्या खेड्यातील युवा समाजसेवक अभिजित कुडे यांचा खैरे कुणबी समाज संघटना बुटीबोरी द्वारा आयोजीत स्नेहमिलन सोहळा मध्ये शाल, सन्मान चिन्ह श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कुडे हे फक्त १९ वर्षाचे असुन त्यांचे कार्य बघता त्यांचा सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिर, वृक्ष रोपण, पर्यावरण संगोपन , लॉक डाऊन मध्ये गावातली मुलांची शाळा, वेगळ्या वेगळ्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सामुहिक दिवाळी, “माझं गावं माझं व्हिजन ” सामजिक संदेश देणारी मिरवणुक, कोरोना काळात अन्य धान्य व किराणा ची मदत, पुर ग्रस्तांना आथिर्क मदत, अश्या अनेक उपक्रम व सामजिक कार्याची व्याप्ती आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन खैरे कुणबी समाज संघटना बुटीबोरी द्वारा त्यांचा सत्कार करण्यात आला.

श्री येटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी मंचावर राजुरा विधानसभा आमदार सुभाष झाडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्री . सुभाष चौधरी सर , प्रेमजी झाडे नगराध्यक्ष वाडी नागपुर, डॉ. विजय तांगडे प्रोफेसर नागपूर विद्यापीठ, श्री . दिलीपराव जोगवे, विनोदराव चौधरी, रणरागिणी मंच संस्थापिका श्रीमती संगीता बढे, न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष अमोल घोटेकर, रंजीत कुडे, विजय कुडे, विनोद कोठारे, ऋषिकेश कुडे व समाज बांधव उपस्थित होते .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.