Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तिमरम येथे विकास कामांचे भूमिपूजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या हस्ते भूमिपूजन
  • जि.प.सदस्य श्री.अजय नैताम यांच्या प्रमुख उपस्थिति

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अहेरी 09 फेब्रुवारी :- अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तिमरम येथे ठक्कर बाप्पा आदिवासी सुधार योजने अंतर्गत अंगनवाडी ते खुशाल सिडाम यांच्या घरापर्यंत व गुड्डिगुडम येथे चिन्नू सोयाम ते जयराम सिडाम यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता मंजूर झाला असून या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
पावसाळयात ह्या रस्तावर मोठ्या प्रमाणात चिखल साचून आवागमन करन्यास येथील नागरिकांना अडचणी होत होत्या. या ठिकाणी रस्त्याचे बांधकाम आवश्यक असल्याने जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे नागरिकांनी मागणी केली असता सदर रस्तबांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या रस्ता भूमिपूजनाच्या वेळी जि.प.सदस्य अजय नैताम, जि.प.सदस्या सुनीता कुसनाके, तिमरम ग्रामपंचायतींचे माजी सरपंच महेश मडावी, माजी उपसरपंच शशिकला पेंदाम, समया पेंदाम,नारू आत्राम, संजु सिडाम, संदेश सिडाम, विवेक सोयाम, तुकाराम सड़मेक, धर्मा सड़मेक, नामदेव ओनपाकला, श्रीनिवास आईलवार, दिलीप सड़मेक, प्रकाश दुर्गे, वासुदेव सिडाम,आदि उपस्थिती होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.