Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दूध विकून परत येताना दुचाकीस्वार युवकाचा अपघातात मृत्यू

चामोर्शी गावात पसरली शोककळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली :  चामोर्शी  तालुक्यातील चामोर्शी (माल) येथील  मंथन प्रकाश लाकडे वय १९ वर्ष  रा. चामोर्शी (माल) ता. चामोर्शी, जि. गडचिरोली असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

मंथन हा बाहेरगावी आपल्या नातेवाइकाकडे राहून शिक्षण घेत होता. तीन दिवसांपूर्वी मंथन लाकडे  स्वगावी तो आला होता.  मंथन हा एम. एच. ३३ ए.एफ. ७५५३ या क्रमांकाच्या मोटार सायकलने सकाळी घरचे दूध डेअरीवर देण्यासाठी ठाणेगावला गेला. ठाणेगाव येथील दूध डेअरीवर दूध विकून दुचाकीने गावाकडे परतत असताना समोरून येणाऱ्या तीन चाकी मालवाहू रिक्षाने समोरासमोर धडक दिली. यात मंथन प्रकाश लाकडे हा दुचाकीचालक युवकांचा मृत्यू झाला. सदरची  घटना रविवार, १५ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास वनखी गावाजवळ घडली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ठाणेगाव येथील डेअरीवर दूध देऊन मोटार सायकलने चामोर्शी माल या आपल्या गावाकडे परत येत  असताना वनखी ते चामोर्शी माल डांबरी रोडवरील रामदास खेवले यांच्या शेताजवळ समोरून येणाऱ्या एम. एच. ३४ बी.एच. २०२४ क्रमांकाच्या पिवळ्या रंगाच्या तीनचाकी मालवाहू रिक्षाने मंथनच्या मोटरसायकलला समोरासमोर जबर धडक दिली. अपघातात मंथन याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रिक्षाचालक देवराव शंकर साळुंखे, नेहरूनगर (चंद्रपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण पहा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

 

Comments are closed.