Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिरोंचातील दोन दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोलीस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई

४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सिरोंचा 25 जानेवारी :-  शहरातील वार्ड क्रमांक ९ व वार्ड क्रमांक १४ मधील दोन दारूविक्रेत्यांच्या घरातून २४ लिटर साखरेची दारू जप्त करीत दोघांवरही सिरोंचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिरोंचा पोलीस व मुक्तीपथने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईमुळे शहरातील दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

शहरातील वार्ड क्रमांक ९ मध्ये धनलक्ष्मी सोडवली वेमुला (42) ही महिला दारूविक्री करीत असल्याची माहिती प्राप्त होताच सिरोंचा पोलिसांनी तिच्या घराची तपासणी केली. दरम्यान घरातील बेडखाली २० लिटर साखरेची दारू आढळून आली. वार्ड क्रमांक १४ मधील अफसर शेख जीलानी (57) याच्या घरातून ४ लिटर साखरेची दारू जप्त करण्यात आली. असा एकूण ४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत सिरोंचा पोलिसांनी दोन्ही दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. सिरोंचा पोलीस व मुक्तीपथने केलेल्या कारवाईमुळे शहरातील दारूविक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अमलदार बिश्वास यांनी केली. यावेळी मुक्तीपथ तालुका चमू उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.