Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्वच्छता अभियानात सर्वांचा सहभाग आवश्यक – कमांडंट एम एस खोब्रागडे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी, 1 ऑक्टोंबर : गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी आवाहन करून राबवीत असलेल्या स्वच्छता अभियानात सामील होण्याचे आवाहन केले. त्याच पार्श्वभूमीवर प्राणहिता कॅम्प मधील 37 बटालियनचे कमांडंट एम एस खोब्रागडे यांच्या नेतृत्वात अहेरी येथील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून सर्वांनी सहभाग घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन यावेळी केले.
प्राणहिता कॅम्प स्थित 37 बटालियनने स्थानिक बस स्थानकाचा परिसर बस स्थानकापासून गांधी चौक, गांधी चौकापासून मज्जित चौकापर्यंत स्वच्छता अभियान स्थानिक महिला मंडळ व गणमान्य व्यक्तींच्या सानिध्यात राबविले.
सोबतच एडवोकेट भावना खोब्रागडे, श्रीमती स्नेहल सातोरे, उपकमांडंट चंद्रमोरे अनिल, चिकित्सा अधिकारी अरविंद सातोरे, निरीक्षक रितू राठी यांनीही हातात झाडू घेऊन अभियानाला प्रोत्साहन दिले.
अभियाना वेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष आर.एम मेंगनवार, बस स्थानक प्रमुख सी . डी.घागरगुंडे, रोल फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश कुमार, सखी मंचच्या अध्यक्ष किरण भांदक्कार, हेल्पिंग हँडच्या अध्यक्ष पूर्व दोंतुलवार व त्यांचे सर्व सहकारीयांनी सहभाग घेऊन स्वच्छता अभियान योग्य प्रकारे राबविले.

हे पण वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.