Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चद्रपूर जिल्हा परिषदेत आता मिळणार ताजा भाजीपाला

Get real time updates directly on you device, subscribe now.

पंचायत राज समितीचे अध्यक्ष रायमुलकर यांच्या हस्ते मार्टचे उदघाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चद्रपूर 12 फेब्रुवारी:- उमेद अभियानाच्या वतीने चंद्रपूर जिल्हा परिषद परिसरात हिराई रुरल मार्ट अंतर्गत भाजीपाला व शेतमाल उत्पादन विक्री केंद्राचे आज पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी इतर समिती सदस्यांसह आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, प्रकल्प संचालक शंकर किरवे, जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मेद अभियानातील स्वंयसहायता समुहांना अधिकाधिक बाजारपेठ मिळावी, यासाठी ठिकठिकाणी समुह संचालित मार्ट सुरू करण्यावर अभियानाचा भर आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून स्वयंसहायता समुहांच्या महिलांनी उत्पादित केलेला ताजा भाजीपाला कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मिळावा, यासाठी जिल्हा परिषद परिसरात हिराई रुरल मार्ट मध्ये ताजा भाजीपाला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या उमेद अभियानातील स्वयंसहायता समुहांची उत्पादने येथे विक्री केली जाणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा व्यवस्थापक प्रवीण भांडारकर, संदीप घोंगे, गजानन भिमटे, नरेंद्र नगराळे, प्रफुल्ल भोपळे, प्रवीण फुके, सोनल जांभुळकर यांनी सहकार्य केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.