Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठाने आदिवासी भागातून आत्मनिर्भर भारताची सुरुवात करावी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 28 जानेवारी:- आत्मनिर्भर भारताची सुरूवात आदिवासी भागातुन झाली पाहिजे कारण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर जीवन आदिवासी जगत असतात. या दृष्टीकोणातुन गोंडवाना विद्यापीठाने गोंडवानाचा प्रदेश कशाप्रकारे आत्मनिर्भर बनवता येइल यादृष्टीने प्रयत्न करावे, जेणेकरून गोंडवाना विद्यापीठाचे विद्यार्थी नोकरीकरीता फिरणार नाही तर ते आत्मनिर्भर होतील. गोंडवानाचा भाग स्वर्ग सुंदर आहे. या भागातील वातावरण निसर्गमय असून या भागात कोरोना महामारीचा प्रकोप कमी होता असे प्रतिपादन मा. महामहिम राज्यपाल तथा कुलपती (म.रा) यांनी विद्यापीठाच्या आठव्या दिक्षांत समारंभ प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन केले. ते पुढे म्हणाले की, आचार्य पदवी प्राप्त व सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थी विश्व कल्याणाकरीता आपले जीवन सर्मपित करतील या विश्वासासह त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्याने सुवर्ण पदक किंवा हिऱ्या प्रमाणे आपले जीवन कसे चमकेल व समाजाला कसा प्रकाश देता येइल याचा चिंतन करणे गरजेचे आहे. गोंडवाना भागात मानवाला शिकण्यासारखे खुप आहे. या भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठया प्रमाणात उर्जा आहे. वर्तमान काळात आदिवासी समाज आधुनिकतेच्या परिणामापासून खुप दुर आहे. गोंडवाना विद्यापीठाने या भागातील नैसर्गीक संसाधने कशाप्रकारे सुरक्षित ठेवून त्याचा कसा विकास करता येइल या दृष्टीकोनातुन प्रयत्न करणे आवश्यक आहे. आजही आदिवासींच्या अनेक समस्या आहेत. आदिवासींच्या विकास हा प्रकृतीच्या अनुकुल करणे गरजेचे आहे. आदिवासींची कला अदभूत असून तीला विकसित करण्याची गरज आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रसंगी मा. कुलगुरू आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आदिवासी आणि वन विद्यापीठ म्हणून विशेष दर्जा मिळवा. पदव्युत्तर शिक्षण विभागासाठी, परिक्षा व प्रशासकिय विभागासाठी, इमारत बांधण्यासाठी निधी मंजुर करावा. स्थानिक आदिवासी कलाकार आणि लोकनाटय यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष सांस्कृतीक सभागृह मंजुर करावे, स्वतंत्र सहसंचालक कार्यालय मंजुर करावे तसेच मॉडेल कॉलेज बांधण्यासाठी विशेष निधी मंजुर करण्याबाबत मागण्यांचा आशय मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, उदय सामंत, यांना उददेशुन व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, हा दिक्षांत समारंभ विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण टप्पा आहे.

आपल्या परीश्रम आणि समर्पणातुन मिळवलेली पदवी आणि पुरस्कार आपल्यासाठी शिक्षक आणि पालकासाठी अभिमानाचा क्षण आहे. आपण ऐतिहासीक भूमीचे वारसदार आहात. गोंडवाना आणि शहीद बिरसा मुंडा, बाबा आमटे व देवाजी तोफा यांच्या सारखे विलक्षण व्यक्तीमत्वाची भूमी आहे. यांच्या कार्यामुळे आणि योगदानाने भारताचा इतिहास समृद्ध झाला आहे. यावेळी संचालक, राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषद बेंगलोर, डॉ. एस. सी. शर्मा म्हणाले भारतातल्या विविध आदिवासी जमातीमध्ये गोंड सगळयात मोठे आदिवासी आहे. जे भारताच्या मध्य पर्वतीय भागामध्ये राहतात. ते दृढ निश्चय आणि मेहनती लोक आहे. आपण पाहतो को त्यांच्या जीवन मानामध्ये चालीरिती, पंरपरा, आणि संस्कृती यांचा परस्पर संबंध आहे. याचा त्यांच्या सामाजीक, आर्थिक जीवनावर अधिक प्रभाव पडतो.
या दिक्षांत समारंभात २२ विद्यार्थ्यांना २८ सुवर्ण पदके व ६९ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. या प्रसंगी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य व विद्यापीठाचे विविध प्राधिकरणाचे सदस्य, दानदाते तसेच गडचिरोली व चंद्रपुर जिल्हातील प्रतिष्ठीत नागरीक, विद्यापीठासी संलग्नीत विविध महाविद्यालयाचे अध्यक्ष, सचिव, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदिनी या कार्यक्रमाचा आभासी पद्धतीने लाभ घेतला. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. शिल्पा आठवले व डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले तर आभार विद्यापीठाचे कुलसचिव, डॉ. अनिल चिताडे यांनी केले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.