Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वेरुळ लेणी, विशाळगड यासारख्या ऐतिहासिक वास्तुंकडे शासनाने लक्ष देण्याची गरज – विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

छत्रपती संभाजीनगर 16 जुले – एनआयए ने वेरूळ लेणी परिसरात घातपात होऊ शकतो असा अहवाल दिला आहे. मात्र पुरातत्व विभाग गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत केला. ताज महाल किंवा अन्य ऐतिहासिक वारसा स्थळी कडक सुरक्षा व्यवस्था असते. वेरूळ येथील लेणी जगातील आश्चर्यां पैकी एक आहे. आताच शहरात अतिरेकी कारवाईचा कट रचणाऱ्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीचा पोलिसांना अहवाल सुद्धा देण्यात आलाय. तरी सुद्धा वेरूळला पोलीस चौकी नाही, तपासणी होत नाही, पुरातत्व खाते दुर्लक्ष करते, इकडे राज्या सरकारने लक्ष द्यावे. जिल्ह्यातील अजिंठा, बीबी का मकबरा, सगळीकडे सुरक्षा देण्याची गरज आहे अस अंबादास दानवे यांनी सांगितले. विशाळ गडावरील अतिक्रम काढण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले असताना सरकार का अतिक्रमण काढत नाही ? असा प्रश्न विचारत
विशाळ गडावर असलेले अतिक्रमण काढण्याची मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली आणि त्यासाठीच त्यांनी काल प्रयत्न केला. विशाळगड बाबत निर्देश कोर्टाने दिले आहेत, सरकारने गेल्यावेळी गवगवा केला मात्र अतिक्रमण काढले नाही. अतिक्रमण सरकारने काढली पाहिजे ही भूमिका आमची आहे, बरं जे योग्य भूमिका घेतात त्यांच्यावर गुन्हे दाखल होतंय. राजे जी मागणी योग्य असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे म्हणजे सरकारचे अतिक्रमण संरक्षण आहे असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. पूजा खेडकर यांची वागणूक सनदी अधिकाऱ्यासारखी नाही, ती तिचें कुटुंब असे वागत असेल तर वाईट आहे, तिच्या कुटुंबातील अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या सोबत त्यांचे वयक्तिक संबंध असू शकतात. मात्र त्यांच्यावर कुणाचाही राजकीय वरदहस्त असेल तर, वरदहस्त करणाऱ्या नेत्याची देखील चौकशी, कारवाई व्हायला हवी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.

Comments are closed.