लोकस्पर्श न्यूज हे जनसामान्यांना न्याय मिळवून देणारे मंच ठरावे:जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे लोकस्पर्श न्यूज च्या शुभारंभ प्रसंगी प्रतिपादन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
आलापल्ली :दिनांक25 ऑक्टोबर
सध्याचे युग हे समाजमाध्यमांचे युग आहे.प्रिंट,इलेक्ट्रॉनिक माध्यमांनंतर आज समाजमाध्यमांचे बऱ्यापैकी वर्चस्व निर्माण झाले आहे.त्यामुळे डिजिटल समाजमाध्यमातून लवकर आणि स्वस्त आणि सुलभ रित्या बातम्या वाचक, दर्शकांपर्यत पोहोचण्याचे काम होत आहे.त्यामुळे वेब न्यूज पोर्टल आज काळाची गरज झाली आहे.त्यामुळे लोकस्पर्श न्यूज हे जनसामान्यांना न्याय मिळवून देणारे मंच ठरावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आज विजयादशमी च्या शुभमुहूर्तावर लोकस्पर्श न्यूज चा थाटात शुभारंभ प्रसंगी केले.
आलापल्ली येथील बाजारवाडी मध्ये झालेल्या या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून ते उपस्थित होते.यावेळी झालेल्या कार्यक्रमाला माजी उपसरपंच दिलीप गंजीवार, सलीम शेख,प्रशांत गोडसेलवार,हंसराज राऊत, मोहन दुर्गे,राकेश गड्डेपाकवार ,जुलेख शेख, आदींची उपस्थिती होती.
Comments are closed.