Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वृद्धाश्रमातील 16 ज्येष्ठांना निराधार योजनेअंतर्गत मंजुरी आदेश प्रधान

डेबु सावली, देवाडा येथे आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन साजरा

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, दि. 2 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर मार्फत डेबू सावली, देवाडा वृद्धाश्रमात आंतरराष्ट्रीय वृद्ध दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म यांच्या हस्ते वृद्धाश्रमातील 16 ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या निराधार योजनेअंतर्गत मंजुरी आदेश प्रदान करण्यात आले व ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला नायब तहसीलदार राजू धांडे, श्री खंडाळे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी मनोज पाठवते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर कार्यालयाचे सचिव सुमीत जोशी यांनी वृद्धाश्रमाला भेट दिली असता ज्येष्ठ नागरिकांनी निराधार योजनेचा लाभ कसा मिळू शकेल, याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्याप्रमाणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (ज्येष्ठ नागरिकांसाठी विधी सेवा योजना 2016) अंतर्गत चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार यांच्याकडे याबाबत विचारणा करण्यात आली. संजय गांधी निराधार योजना व अन्य काही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असल्याचे कळल्यानंतर आवश्यक कागदपत्रे व विहित नमुन्यातील अर्ज भरून घेण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे राहुल शिरसागर तथा नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार व इतर कर्मचारी हे डेबू सावली येथील वृद्धाश्रमात पोहोचले आणि त्यांनी तेथे जाऊन संबंधित वृद्धांचे अर्ज भरून घेतले व दाखल केले.

Leave A Reply

Your email address will not be published.