Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बंगाली समाजाचा बार्टी मार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल केंद्राकडे पाठवा

आमदार डॉ. देवराव होळी यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली विनंती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 20,ऑक्टोबर :- आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रयत्नातून बंगाली समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण २०१९ मध्ये बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) मार्फत करण्यात आले होते. मात्र तो अहवाल अजून पर्यंत केंद्र सरकारकडे न पाठवण्यात आल्याने बंगाली समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे.  त्यामुळे या सर्वेक्षणाचा अहवाल केंद्र सरकारला पाठवावा अशी विनंती आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मुंबई येथे भेट घेऊन केली आहे. यावेळी त्यांनी या विषयावर लवकरच मंत्रालयात बैठक लावावी यासाठीही केली विनंती

बंगाली समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्याच प्रयत्नातून २०१९ बार्टी पुणेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्यात आला . त्या सर्वेक्षणाचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवणे आवश्यक होते. मात्र राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आल्याने बंगाली समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला नाही परिणामी सदर प्रश्न प्रलंबित राहिला. आता पुन्हा राज्यात भाजपा शिवसेना युतीचे सरकार आल्याने बंगाली समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागावा यासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र  फडणवीस यांची भेट घेतली व त्यांनी सदर अहवाल केंद्र शासनाला पाठवावा अशी विनंती केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणविस यांनी याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन अहवाल पाठविला जाईल असे आश्वस्त केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

 

Comments are closed.