मेलेल्या माणसाबरोबर अप्लिकेशनने बोलता येणार? “या” कंपनीने केला दावा
आपण जिवंत माणसाची फोनवर बोलतो, पण मेलेल्या माणसा बरोबर बोलता आले तर? त्यांच्यासोबत गप्पा मारता आल्या तर.. विश्वास बसत नाही? पण हे खरं आहे. एका जगप्रसिद्ध कंपनी असा दावा केला आहे.
कम्प्युटर जगतात क्रांती आणणाऱ्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीने नुकतेच चॅटबोट या अप्लीकेशनच्या माध्यमातून मेलेल्या माणसासोबत गप्पा मारता येणार आहे असा दावा केला आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या चॅटबोट या सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन द्वारे दोन व्यक्तींना संपर्क साधता येणार आहे. असा दावा करण्यात आला आहे. त्याचे पेटंट ही घेतले आहे. मायक्रोसॉफ्टला एका अश्या चॅटबोटसाठी पेटंट देण्यात आले आहे. ज्याच्या माध्यमातून मृत व्यक्तीशी संपर्क साधता येणार आहे. यामध्ये मित्र, नातेवाईक, सेलेब्रिटीस, अनोळखी माणसं यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
ब्लॅक मिरर या वेब सिरीज पासून या चट बोर्डच्या निर्मितीची प्रेरणा घेतली असल्याचं बोललं जात आहे. वेब सिरीज मध्ये दाखवण्यात आलेल्या कथानका नुसार एका अशाच ॲपच्या माध्यमातून एक प्रेयसी आपल्या मृत प्रियकरासोबत चॅट करते. मिळालेल्या माहितीनुसार मायक्रोसॉफ्ट मुळे मृत व्यक्तीच्या सोशल प्रोफाईल मधून त्यांचा डेटा घेतला जाणार. त्यानंतर मिळालेल्या डेटातून प्रोग्राम तयार केला जाणार. त्यानुसार मृत्य व्यक्तीशी गप्पा मारता येणार आहे. पण सध्या मायक्रोसोफ्ट हा चॅटबोट लॉन्च करण्याचा विचारात नाही कारण मृत व्यक्तीसोबत बोलायला मिळणार याबाबत अनेक जण आनंदी आहेत. मात्र जगभरातल्या अनेकाकडून या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आले आहे. काही नेटकऱ्यांनी अशा प्रकारच्या गोष्टींवर विश्वास नसल्याचे सांगितले आहे. तर काहीनी हे सगळंच विलक्षण हादरवनार असल्याचं म्हटल आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टने सध्यातरी हा चॅटबोट लाँच करणार नसल्याचे सांगितले आहे.
Comments are closed.