Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ब्रिटनहून येणाऱ्या सर्व हवाई वाहतुकीवर भारताकडून बंदी

31 डिसेंबरपर्यंत रद्द; केंद्राचा मोठा निर्णय

ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरसचा नवी प्रजाती सापडला आहे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवी दिल्ली डेस्क, 21 डिसेंबर : भारतात ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरसचा नवा प्रकार समोर आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट येणार की काय अशी भीती तज्ज्ञांमध्ये व्यक्त केली जात असताना विदेशातून मात्र अजून एक गंभीर बातमी समोर आली आहे. ब्रिटन (UK) अर्थात युनायटेड किंग्डममध्ये कोरोनाच्या अधिक घातक रुपातलं उत्परिवर्तन आढळलं आहे. त्यामुळे विमान वाहतूक बंद करण्याची मागणी होत होती.

21 डिसेंबरच्या मध्यरात्रीसून 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंतच्या भारत- ब्रिटन दरम्यानच्या सगळ्या विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यासंबंधीची घोषणा मंत्रालयाने केली आहे. डिसेंबर अखेरीपर्यंत भारतात ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व विमानं रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांवर क्वारंटाइनचे कडक नियम करण्यात आले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

इंग्लंड देशात कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 1000 रुग्णांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान, या विषाणूचा संसर्ग वाढत जरी असला, तरी हा विषाणू आधीच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत कमी संहारक आहे. तशी माहिती ब्रिटिश वैज्ञानिकांनी दिली आहे.

सरकार सावध आहे, घाबरून जाण्याची गरज नाही : आरोग्यमंत्री हर्षवर्धन
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या (स्ट्रेन) संसर्गाबाबत सरकार सतर्क असून घाबरून जाण्याची गरज नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, गेल्या एका वर्षात कोविड -19 ला सामोरे जाण्यासाठी जे महत्वाचे होते, त्या सर्व गोष्टी सरकारने केल्या आहेत.

Comments are closed.