Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Earth Hour : आज जगभरात रात्री 8:30 वाजता विद्युत दिवे बंद करुन केला जाणार साजरा

अर्थ अवर डे ही वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरची मोहीम आहे ज्याचा हेतू ऊर्जा बचत आणि पर्यावरण संरक्षणाबद्दल लोकांना जागरूक करणे आहे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 27 मार्च:- दरवर्षी मार्चच्या शेवटच्या शनिवारी रात्री साडेआठ वाजता जगभरातील कोट्यावधी लोक एका तासासाठी घरातील विद्युत दिवे बंद करतात आणि पृथ्वीच्या उन्नतीसाठी एकत्रित होतात. हा दिवस जगभर अर्थ अवर दिन म्हणून ओळखला जातो. यावेळी, अर्थ आवर दिन 27 मार्च रोजी आला आहे. यानिमित्ताने जगातील 180 हून अधिक देशांतील लोकं रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत त्यांच्या घरातील विद्यूत दिवे बंद ठेवतील आणि उर्जेची बचत करून पृथ्वी वाचवण्यासाठी एकतेचा संदेश देतील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर या वन्यजीव आणि पर्यावरण संघटनेने 2007 मध्ये अर्थ अवर डेची सुरुवात केली होती. 31 मार्च 2007 रोजी प्रथमच अर्थ अवर दिन साजरा करण्यात आला. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे हे प्रथम आयोजित करण्यात आले होते. यात लोकांना 60 मिनिटांसाठी सर्व दिवे बंद ठेवण्याची विनंती केली गेली. हळूहळू हे जगभरात साजरे होऊ लागले.

Comments are closed.