Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पीएनबी बँक घोटाळा; फरार आरोपी मेहुल चोक्सीला इंटरपोलकडून दिलासा

भारतातून फरार झाल्यानंतर जवळपास 10 महिन्यांनी ही नोटीस बजावण्यात आली होती.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

Mehul Choksi 21 मार्च : पीएनबी बँकेचीफसवणूक करणारा मेहुल चोक्सी आता जगात कुठेही फिरू शकणार आहे. फरार आरोपी मेहुल चोक्सीला इंटरपोलकडून दिलासा मिळाला आहे. त्याच्याबाबत इंटरपोलनं जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेण्यात आली आहे. इंटरपोलने 2018 मध्ये मेहुल चोक्सीविरोधात रेड नोटीस जारी केली होती. भारतातून फरार झाल्यानंतर जवळपास 10 महिन्यांनी ही नोटीस बजावण्यात आली होती.

पंजाब नॅशनल बँकेतील 13 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी इंटरपोलच्या ‘रेड नोटीस’मधून फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचं नाव मागे घेण्यात आलं आहे. मेहुल चोक्सीने फ्रान्सच्या लियोन शहरातील इंटरपोलच्या मुख्यालयात रेड नोटीसला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे सीबीआयने या घडामोडीवर मौन बाळगलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.