Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रेल्वेनं ठराविक स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांवरुन 50 रुपये

नवे दर 15 जूनपर्यंत लागू राहतील

गर्दी टाळण्यासाठी रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर वाढवण्यात आले आहेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबई डेस्क 2 मार्च:-  मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आता मुंबई मेट्रोपोलिटन रिजन म्हणजे MMR रिजनमधील प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट तब्बल 5 पट वाढवलं आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता उन्हाळ्यात गर्दी रोखण्यासाठी मध्य रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे. मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट आता 10 रुपयांवरुन 50 रुपये केली आहे.

यापूर्वी मार्च 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीट वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मध्य रेल्वेनं मुंबई, पुणे, भुसावळ, आणि सोलापूर डिव्हिजनमध्ये प्लॅटफॉर्म तिकीत 10 रुपयांवरुन 50 रुपये केलं होतं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवे दर 15 जूनपर्यंत लागू राहतील

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यात रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर 50 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेचा हा निर्णय गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घेण्यात आला आहे. रेल्वेने निश्चित केलेले नवे दर 24 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत. हे दर 15 जूनपर्यंत लागू असणार आहेत. उन्हाळ्यात अनेक लोक सुट्ट्यांसाठी जात असतात. तसंच यात्रांसाठी जाणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर वाढवण्यात आले आहेत.

Comments are closed.