Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नाफेडतर्फे चना खरेदी सुरू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 2 मार्च : हंगाम 2020-21 मध्ये शासनाने चना खरेदीसाठी प्रति क्विंटल रुपये 5100 दर मंजूर केला आहे. चना खरेदीसाठी केंद्र शासनाने नाफेडची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली असून नाफेडच्या वतीने राज्यामध्ये पणन महासंघामार्फत चना खरेदी सुरू आहे. चना खरेदीच्या नोंदणीचा कालावधी 15 फेब्रुवारी 2020 पासून सुर झाला असून चना खरेदी 25 फेब्रुवारी ते 24 एप्रिल 2021 या कालावधीत करण्यात येणार आहे.

ज्या तालुक्यात खरेदी केंद्र सुरू नाही त्या तालुक्यांना खालीलप्रमाणे दिलेल्या खरेदी केंद्रावर तालुकानिहाय जोडण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चंद्रपूरसाठी भद्रावती, पोंभुर्णा, सावली व मुल, वरोरा खरेदी केंद्रासाठी वरोरा व भद्रावती, चिमुर खरेदी केंद्राला ब्रम्हपुरी, सिंदेवाही व नागभिड, गडचांदुर खरेदी केंद्राला कोरपना व जिवती, राजुरा खरेदी केंद्राला गोंडपिपरी व बल्लारपूर तालुके जोडण्यात आले आहेत.
तरी वरीलप्रमाणे दिलेल्या खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करणेसाठी आपले आधार कार्ड व्होटींग कार्ड, शेतीचा सातबारा, बँक खाते पासबुक इ. संपुर्ण माहितीसह खरेदी केंद्रावर जावून नोंदणी करावी व दिलेल्या मुदतीत संबंधीत खरेदी केद्रावर चना विक्री करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए.आर.गोगीरवार यांनी कळविले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.