मिशन बिगीन अगेन आदेशास 31 मार्च पावेतो मुदतवाढ – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
चंद्रपूर, दि. 2 मार्च : जिल्ह्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनाच्या सूचनेनुसार वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेश व सुचना यांना दिनांक 31 मार्च 2021 पावेतो मुदतवाढ देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भावानुसार घोषित करण्यात आलेले लॉकडाऊन टप्पेनिहाय समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्याकरिता मिशन बिगीन अगेन बाबत वेळोवेळी सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशांना 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून सर्व संबंधीत प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता, साथरोग कायदा व व इतर संबंधीत कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
Comments are closed.