Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आमदार किशोर जोरगेवार यांनी संताप व्यक्त करताच गॅलरीतील आमदारांना मिळाला लॅपटॉप

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. ४ मार्च: कोरोनामूळे अधिवेशनात सामूहिक अंतर राखल्या जावे यासाठी काही आमदारांना गॅररीत बसविण्यात आले आहे. मात्र या आमदारांना लॅपटॉप दिल्या गेल्या नसल्याने सभागृहातील कामकाज पाहण्यास अडचण येत होती. यावर काल चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार यांनी संताप व्यक्त केला होता. त्यांनतर आज येथील सर्व आमदारांना लॅपटॉप उपलब्ध करुन देण्यात आले.

  मध्यतरी कमी झालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत अचाणक वाढ झाली आहे. अशातच अर्थसंकल्पीय अधिवेशेन होत असल्याने सभागृहात कोरोना बाबतचे सर्व नियम पाळल्या जात आहे. अधिवेशना दरम्याण सामूहिक अंतर पाळल्या जावे या करीता एका बेंचावर एका आमदारालाच बसविण्यात येत आहे. तर उर्वरीत आमदारांसाठी सभागृहातील गॅलरी येथील बेंचेस आरक्षीत करण्यात आले आहे. मात्र गॅलरीत बसणा-या आमदांकडे लॅपटॉप न दिल्या गेल्याने सभागृहातील कामगाज पाहणे व ते समजने अवघड झाले होते. त्यामूळे काल राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांना  आमदार किशोर जोरगेवार यांनी या प्रकारावर असंतोष व्यक्त केला होता. याची दखल सभागृहाच्या वतीने घेण्यात आली असून आज पासून गॅलरीत बसणा-या सर्व आमदारांना लॅपटॉप उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.