Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गौताळा वनक्षेत्रात आता तिसऱ्यांदा पट्टेदार वाघाचे दर्शन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

औरंगाबाद, दि. १९ मार्च:  औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा अभयारण्यात पट्टेदार वाघाचं दर्शन झाले आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात या पट्टेदार वाघाच्या पायाचे ठसे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळले होते. त्यानंतर वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात या वाघाचे छायाचित्र आले.  त्यानंतर 15 मार्चला गौताळ्यात या पट्टेदार वाघाचा वावर असल्याचे स्पष्ट झाले.

गौताळा अभयारण्यात 1940 मध्ये त्यानंतर 1970 मध्ये पट्टेदार वाघाचे दर्शन झालं होतं. आता तिसऱ्यांदा पट्टेरी वाघाचे अस्तित्व येथे आढळून आले आहे. हा पट्टेदार वाघ यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवठा येथून ४५० किलोमीटरचा प्रवास करुन वाघ आला असल्याचं वनविभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तो फिरस्ती वाघ असल्याने मराठवाड्यात त्याचा अधिवास होईल काय? याविषयी शंका आहेत. पण मादी वाघ या भागात आली तर तो गौताळा अभयारण्यात राहू शकतो असे सांगण्यात येत आहे. गौताळा अभयारण्य वाघांच्या अधिवासास उपयुक्त आहेत. नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठे तसेच अन्नसाखळी या भागात असल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात येत आहे. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातच गौताळा हे मोठे वनक्षेत्र आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून गौताळा अभयारण्यातील पर्यटन बंद असल्यामुळे प्राण्यांना मुक्त संचार करता आला. यासह गौताळा अभयारण्यात वाघासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण आणि खाद्य उपलब्ध असल्यामुळे तो या भागात आला असावा असा अंदाज वर्तविली जात आहेत. यासह अजिंठा भागातही एकदा वाघ असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांची कोणाकडे नोंद नाही. दीर्घ कालावधीनंतर गौताळ्यात पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्यामुळे त्याच्या संवर्धनाची जबाबदारी वन विभागावर आली आहे. त्या दृष्टीने वन विभागातर्फे उपाययोजानांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.