Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! विनामास्क रोखले म्हणून पोलिसांच्या अंगावर ओतले पेट्रोल!

Get real time updates directly on you device, subscribe now.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात अल्पवयीन युवकाचे कृत्य.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिंधुदुर्ग, दि. २० मार्च:- जिल्ह्यातील कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक या गजबजलेल्या ठिकाणी येथे कर्तव्य बजावणारे वाहतूक पोलीस विश्वजीत परब आणि चंद्रकांत माने यांच्या अंगावर एका अल्पवयीन युवकाने चक्क पेट्रोल ओतले. तेवढ्यावरच न थांबता सोबतच आणलेल्या माचीसच्या सहाय्याने पोलीस कर्मचाऱ्यांना पेटविण्याचाही प्रयत्न केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या पोलीस कर्मचाऱ्यांनी सदरहू युवकाला विनामास्क तसेच विनापरवाना दुचाकी चालवत असल्याबद्दल रोखले होते. दोन्ही पोलीस आपल्या कर्तव्य बजावत गुंतले असतांना तरुणाने तेथे आकस्मितपणे धाव घेत हे कृत्य केले. मात्र, तेथे विनामास्क फिरणार्‍यांबाबत कारवाईसाठी तैनात नगरपंचायतीच्या पथकांतील कर्मचारी रविंद्र म्हाडेश्वर आणि प्रविण गायकवाड यांनी तत्परतेने तरुणास रोखले आणि त्याला पकडून पोलीस ठाण्यात दाखल केले. 

त्यांनतर सहाय्यक उपनिरीक्षक बापू खरात यांच्याकडून तरुणाची कसून चौकशी सुरु आहे. शनिवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर पोलीस वर्तुळातही खळबळ उडाली आहे. त्या तरुणाने एवढे भयानक कृत्य करण्यामागचा उद्देश मात्र समजू शकला नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान दोन्ही पोलीस कर्मचारी आणि नगर पंचायत कर्मचारी गायकवाड यांच्या अंगावर तसेच डोळ्यात पेट्रोल गेल्याने त्यांना कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.