Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज ६९ नवीन कोरोना बाधित तर ३० कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २३ मार्च: आज जिल्हयात ६९ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज ३० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित १०२३३ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ९७८४ वर पोहचली. तसेच सद्या ३४१ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण १०८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६१ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ३.३३ टक्के तर मृत्यू दर १.०६ टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन ६९ बाधितांमध्ये गडचिरोलीतील २७, अहेरी ५, आरमोरी ८, भामरागड तालुक्यातील ६, चामोर्शी ९, धानोरा तालुक्यातील १, एटापल्ली १,  तर वडसा तालुक्यातील १२ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ३० रूग्णांमध्ये गडचिरोली मधील २०,  अहेरी ४, चामोर्शी २,  धानोरा १, तर वडसा मधील ३ जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये गोंडवाना विद्यापीठाजवळ १, रामनगर ३, कॅम्प एरिया ३,  विसापुर १, गोकुलनगर १, सर्वोदय वार्ड १, बस स्टॉपच्या मागे धानोरा रोड १, इंदाळा १, वैनगंगानगर एमआयडीसी रोड १, रेड्डी गोडाऊन १, कलेक्टर कॉलनी १, आशिर्वाद नगर २,  बालाजी नगर १, स्थानिक १, एसपी मुनघाटे हायस्कुल १, नंदनवन १, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये धरमपूर १, गिटाली १, स्थानिक २, आलापल्ली १, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये वाघाडा १, स्थानिक ५, वैरागड २, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये एल. बी.पी. हेमलकसा ५, टेकाला १, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये कुनघाडा १, स्थानिक ५, मारोडा २, चाकलपेठ १, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये गोडलवाही १,  एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये गांधी वार्ड २,  सिंधी कॉलनी १, आंबेडकर विद्यालय ५ विसोरा १, कस्तुरबा वार्ड १, स्थानिक १, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये ६ जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.