Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बुलढाण्यात सैलानी बाबांच्या संदल यात्रेत तुफान गर्दी; १०११ नागरिकांवर गुन्हे दाखल

  • सैलानी बाबा संदल यात्रेला परवानगी नसतानाही हजारो नागरिक जमले होते. त्यामुळे जमावबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हजार जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलडाणा, दि. ४ एप्रिल: कोरोना नियमांचं उल्लंघन करत सैलानी बाबा यांचा संदल काढीत गर्दी करणाऱ्यां मुजावर (पुजारी) यांच्यासह १०११ लोकांविरुद्ध रायपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बुलडाणा जिल्ह्यात कोरोणाची दाहक परिस्थिती पाहता जिल्ह्यातील सर्व यात्रा, सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. बुलढाण्यातील सैलानी बाबा यांची संदल यात्रा महोत्सव रद्द करण्यात आली होती. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या वतीने आदेश निर्गमित करण्यात आले होते. केवळ सैलानी बाबाच्या दर्गावर विधीवत पूजा करण्यासाठी आठ लोकांना प्रशासनाने परवानगी दिली होती. मात्र काही मुजावर व्यक्तींनी परवानगी नसतानाही २ एप्रिलच्या रात्री आठ वाजता च्या सुमारास सैलानी बाबा यांचा संदल काढला गेला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या संदल यात्रेमध्ये जवळपास १००० च्या वर लोक सहभागी झाले होते पोलीस प्रशासनाने या सर्व व्यक्तींना वारंवार सूचनाही केल्या मात्र कोणी त्याला दाद दिली नाही. कोरोना नियमांचे उल्लंघन करत हजारो लोकांची गर्दी दिसून आली याप्रकरणी बुलडाणा तहसीलदार रुपेश खंडारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून  रायपूर पोलिसांनी मुजावर व्यक्तींच्या नावासह  १०११ अज्ञात व्यक्तीविरुद्ध कोरोना  नियमांचं पालन न  केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

सैलानी बाबा यात्रा महोत्सवासाठी दरवर्षी राज्यभरातून व परराज्यातून सात ते आठ लाख लोक येत असतात. नारळाच्या होळीने या यात्रा महोत्सवाची सुरुवात होते. पाचव्या दिवशी सैलानी बाबा यांच्या दर्ग्यावर संदल काढून चादर चढविण्यात येत असते. या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने ही यात्रा रद्द केल्याचे जाहीर केले होते. असं असतानाही काही मुजावर व्यक्तींनी नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.