Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वन्यजीवांच्या मृगयाचिन्हाचे संवर्धन कार्य नागपूरात व्हावे – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क, दि. ४ एप्रिल: विदर्भात पुरातन काळातील वन्यजीव प्राण्यांच्या मृगयाचीन्हाच्या ट्रॉफीच्या जतन व संवर्धन साठी सविस्तर प्रस्ताव सादर करा तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करून या प्रयोग शाळेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

मध्य भारतातील एकमेव असलेल्या सेमिनरी हिल्स नागपुर येथिल वन्यजीव जतन व संवर्धन प्रयोग शाळेला त्यांनी भेट दिली त्यावेळेला ते बोलत होते. नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपवनसंरक्षक प्रभुदास शुल्क यांच्यासह माजी महानिदेशक  डॉ. बी. व्ही. खरबडे, लीना झिलपे हाते, वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंदन हते उपस्थित होते. वन्यजीव प्राण्यांच्या ट्राफीचे जतन करणे, त्यांचे संवर्धन करणे आणि त्यातून भावी पिढीला या बाबतची माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विदर्भात आणि त्यातही नागपुर येथे यामध्ये काम करण्याची मोठीं संधी आहे येथे पुरातत्व वस्तू संग्रहालय आहे तसेच मोठ्या प्रमाणावर वन्यप्राण्यांच्या ट्रॉफी आहेत. शिंगे, कागद, कपडे इतर भाग हे सर्व सध्यस्थितीत प्राथमिक अवस्थेत आहेत. त्यांचे जतन व्ह्यायला पाहिजे. राज्यभरात जिथे जिथे आहे, त्या सर्व ट्राफी ना एकत्र केल्यास एक चांगला ठेवा तयार होईल अशी माहिती लीना झिल्पे हाते यांनी दिली. मुख्यमंत्री यांनी नुकतेच गोरेवाडा प्राणिसंग्रहालय येथिल स्थानिक गोंडवाना आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्याच धर्तीवर या प्रयोग शाळेच्या माध्यमातून काम करता येणार असून त्याचा संयुक्त प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री राऊत यांनी विभागाला दिल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नागपूरचे स्थानिक कलचर वाचवायचे आहे त्यामुळे त्या बाबतचा प्रस्ताव तयार करून द्या त्यावर चांगले काम करून स्थानिक तसेच विदेशी पर्यटकांना येथिल संस्कृतीची माहिती मिळेल असेही पालकमंत्री यांनी सांगितले.

Comments are closed.