Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रकांतदादा पाटीलांचे आंदोलन म्हणजे केवीलवाणा प्रकार यशोमती ठाकूर यांचा पलटवार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती :- माझ्या राजीनाम्याच्या मागणीवरून भाजप आणि चंद्रकांतदादा पाटलांनी सुरू केलेले आंदोलन म्हणजे केविलवाणा प्रकार आहे असे प्रतिउत्तर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी चंद्रकांत पाटलांना दिले आहे. पोलीस मारहाण प्रकरणी यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने तीन महिन्यांनी शिक्षा सूनावल्याने यशोमती ठाकुरांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. आज भाजप प्रदेशाध्यक्ष हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी ही यशोमती ठाकुरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

यावर आता यशोमती ठाकुरांनी भाजपला जोरदार प्रतिउत्तर दिल आहे. माझ्यावर लावलेले गुन्हे हे राजकीय आकसापोटी लावण्यात आले आहे. परन्तु भाजपच्या नेत्यावर गंभीर गुन्हे असून ते मात्र मोकळे फिरत आहे अस ठाकूर म्हणाल्या. आधी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागावा नंतरच मला राजीनामा मागा भाजपच्या लोकांनी मला राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही म्हणत भाजप वर यशोमती ठाकूर यांनी टिका केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.