Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात १६ मृत्यूसह आज ५५८ नवीन कोरोना बाधित तर ५१२ कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २७ एप्रिल: आज जिल्हयात ५५८ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज ५१२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित १९४७५ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या १४७५८ वर पोहचली. तसेच सद्या ४३६६ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ३५१ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज १६ नवीन मृत्यूमध्ये ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील ६९ वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील ४० वर्षीय पुरुष, ता.कुरखेडा जि. गडचिरोली येथील ८० वर्षीय पुरुष, ता. सिरोंचा जि. गडचिरोली येथील ७५ वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील ६५ वर्षीय महिला, ता.धानोरा जि. गडचिरोली येथील ६६ वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील ६० वर्षीय पुरुष, आरमोरी रोड, गडचिरोली येथील 38 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील ६८ वर्षीय पुरुष, ता. नागभिड जि. चंद्रपूर येथील ५३ वर्षीय पुरुष,  गडचिरोली येथील 56 वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील ३० वर्षीय महिला, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील ६५ वर्षीय पुरुष,  गडचिरोली येथील ७४ वर्षीय महिला, ता. धानोरा जि. गडचिरोली येथील ५५ वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील ५२ वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.७८ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण २२.४२ टक्के तर मृत्यू दर १.८० टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

       नवीन ५५८ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १६८, अहेरी तालुक्यातील ५३, आरमोरी ५४, भामरागड तालुक्यातील 0, चामोर्शी तालुक्यातील ८२, धानोरा तालुक्यातील ११, एटापल्ली तालुक्यातील १, कोरची तालुक्यातील ५०, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये ५८, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये १३, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये ६८ जणांचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या ५१२ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील १६३, अहेरी ३१,  आरमोरी ३७, भामरागड १९, चामोर्शी ३०, धानोरा २७ , एटापल्ली १६, मुलचेरा १३, सिरोंचा २०, कोरची ३०, कुरखेडा ३८, तसेच वडसा येथील ८८  जणांचा समावेश आहे. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.