छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २७ एप्रिल: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवन येथील महाराजांच्या सिंहसनाधिष्टीत पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन केले.
यावेळी उपमु्ख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, संसदीय कार्य मंत्री ॲड अनिल परब, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन मुजबळ, आमदार राहुल नार्वेकर, आमदार अनिल पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी वरिष्ठ अधिकारी यांनी पुष्प अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
Comments are closed.