Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्मशानात अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह ताब्यात देऊ नये, मुंबई उच्च न्यायालयाची सूचना

  • राज्यात कोरोना महामारीचा कहर सुरु असून एकाच वेळी अनेक मृतदेहांवर अंत्यसस्कार करावे लागत आहे.
  • यासंदर्भात आता मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २७ एप्रिल: राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. परिणामी अनेक कोरोना रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. यासंदर्भात आता मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह ताब्यात देऊ नये, अशी सूचना हायकोर्टाने दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सध्या मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या तुलनेत उपलब्ध व्यवस्था पुरेशी नाही. राज्यभरातील अंत्यसंस्काराच्या ठिकाणांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचे जिल्हा प्रशासनाला हायकोर्टाने निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर राज्यभरातील शवागृहांची स्थितीही सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोना काळातील समस्यांबाबत हायकोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने या सूचना दिल्या आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.