Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना अपर मुख्य सचिवपदी पदोन्नती

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. ३० एप्रिल: राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना आज अपर मुख्य सचिव या पदावर पदोन्नती देण्यात आली असून त्यांची आहे त्या विभागात पदस्थापना करण्यात आली आहे.

वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले डॉ. व्यास हे भारतीय प्रशासन सेवेच्या १९८९ तुकडीचे अधिकारी आहेत. जयपूर येथे एमबीबीएस आणि त्यानंतर एमडी पेडीयाट्रीक हे शिक्षण पूर्ण केले. राज्यात कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात ते महत्वपूर्ण भूमिका बजावत असून त्यांचे वैद्यकीय ज्ञान आणि अनुभव त्यासाठी कामी येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सेवेच्या सुरूवातीचे आठ वर्ष त्यांनी तामीळनाडूच्या उद्योग आणि वित्त विभागात सेवा बजावली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांनी कृषी क्षेत्राशी निगडीत राज्य बियाणे महामंडळ आणि कृषी औद्योगिक विकास महामंडळात आठ वर्ष सेवा केली आहे. मुंबई जिल्हाधिकारी, राज्याचे वित्त सचिव, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. जुलै २०१७ पासून डॉ. व्यास आरोग्य विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.