पोर्टलच्या माध्यमातून ५६ रुग्णांना मिळाले बेड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. ४ मे :- जिल्ह्यात कोराना रुग्णांना चंद्रपूर शहरातील शासकीय व खाजगी रूग्णालयात सहजरित्या ऑकसीजन बेड उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘चंद्रपूर कोविड-१९ पेशंट मॅनेजमेंट पोर्टल’ सोमवारपासून कार्यान्वित केले आहे.
या पोर्टलवर आज सायंकाळपर्यंत १२० रूग्णांची बेड मिळण्यासाठी नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ५३ रुग्णांना ऑक्सीजनचे तर ३ रूग्णांना आय.सी.यू. असे ५६ रूग्णांना बेड प्राप्त झाले आहे. २९ रूग्णांनी नोंदणी केल्यानंतर बेड घेण्यास नकार दिला आहे तर ३५ रूग्ण बेडसाठी प्रतिक्षायादीत आहेत. पोर्टलवर सध्या चंद्रपूर शहरातल्या २८ रूग्णालयामधील १२९६ बेडची नोंदणी करण्यात आली आहे.
Comments are closed.