Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणातूनच तिसरी लाट थोपविणे शक्य – रवीजी अनासपुरे

प्रशासनाने सर्व केंद्रावर लसींचे सामान वाटप करावे.

  • लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क दि. ६ मे : लसीकरण जास्तीत जास्त झाल्यास  नागरिकांना  तिसरी लाटे पासून दूर राहन्यास जी अधिक मदत मिळेल भाजपा संघटन मंत्री अनासपुरे यांनी व्यक्त केले.

यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा आणि लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची, अपंग व अन्य व्याधीने ग्रस्त नागरिकांची काळजी घ्यावी असेही ते म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

क्रिएटिव्ह फाउंडेशन व मुकुल माधव फाउंडेशन च्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय शाळेतील लसीकरण केंद्रात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पाणी बॉटल व ग्लुकोज बिस्कीट देण्याच्या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,बूथ यंत्रणा प्रमुख कुलदीपजी सावळेकर, ओबीसी आघाडी अध्यक्ष रमेश चव्हाण, प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे, प्रभाग उपाध्यक्ष शेखरजी जोशी,महिला आघाडी च्या पदाधिकारी गौरीताई करंजकर, संगीताताई आदवडे,मंगलताई शिंदे इ उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रवीजी अनासपुरे, सौ. मंजुश्री खर्डेकर व कुलदीप सावळेकर यांच्या हस्ते केंद्रप्रमुख डॉ. शाहीन शेख, यांना थर्मल गन, सॅनिटायझर, बिस्किटे व पाणी बॉटल सुपूर्द करण्यात आले.

हे देखील वाचा : 

५० हजार न भरल्याने तब्बल 15 तास मृतदेह कुटुंबीयांना नाही दिला

आरोग्य विभाग कर्मचारी भरती: दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 16,000 पदांच्या भरतीचे आदेश

Comments are closed.