Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरोग्य विभाग कर्मचारी भरती: दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 16,000 पदांच्या भरतीचे आदेश

फोटो स्रोत, facebook कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान राज्यातील आरोग्य यंत्रणांवर ताण येत असल्याचं निदर्शनास येत आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 06 मे:- कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान राज्यातील आरोग्य यंत्रणांवर ताण येत असल्याचं निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेवेळी मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी राज्याच्या आरोग्य विभागात 16 हजार पदांची भरती तातडीने करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

अ आणि ब वर्गातील प्रत्येकी 2 हजार तर क आणि ड वर्गातील सर्व मिळून 12 हजार कर्मचाऱ्याची भरती आरोग्य विभागात करण्यात येणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. गुरुवारी (6 मे) पत्रकारांशी संवाद साधताना राजेश टोपे यांनी ही घोषणा केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रत्येक जिल्ह्यात मनुष्यबळाची कमतरता आहे. आरोग्य विभागाला 50 टक्के पदभरती करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण ती अपुरी असल्याचं आम्ही मंत्रिमंडळाला कळवलं होतं. त्यामुळे आम्हाला पूर्ण क्षमतेने पदभरती करण्याची परवानगी मिळाली आहे. एकूण 16 हजार पदे भरण्यात येतील.

मुख्यमंत्री स्तरावरच ही पदभरती करण्यात येणार असून त्यासाठी मंत्रिमंडळाकडे जाण्याची गरज नाही.

क आणि ड वर्गाच्या जागा विभागीय पातळीवर तर अ आणि ब वर्गातील पदे MPSC कडून परीक्षा घेऊन भरण्यात येतील, अशी माहिती टोपे यांनी दिली.

कोरोनाची तिसरी लाट जुलै-ऑगस्ट महिन्यात येण्याची शक्यता आहे. त्याची पूर्वतयारी राज्यशासनाकडून केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्याला त्याबाबत स्पष्ट सूचना दिलेली आहे. बेड, ऑक्सिजन तसंच मनुष्यबळाच्या बाततीत आपण सज्ज असलं पाहिजे, असे आदेश आरोग्य मंत्री या नात्याने मी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

Comments are closed.