Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सावधान ! डॉक्टरांना न विचारता कोरोनासाठी औषधी घेऊ नका! एकाच कुटुंबात ८ मृत्यू, ५ अत्यवस्थ!!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. ६ मे : छत्तीसगड राज्यातील बिलासपूरमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच कुटुंबातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्या कुटुंबाने डॉक्टरांशी न बोलताच कुणीतरी सुचवलेले औषध घेतले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांच्या तपासात मृत्यूमागील इतर शक्यताही पडताळून पाहिल्या जातील.

एकाच कुटुंबातील सातजणांचे बळी आणि पाच अत्यवस्थ असण्याची ही घटना बिलासपूरच्या सिरगीट्टी पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. कोर्मी गावात कुटुंबातील सर्वांनीच औषध आणि मोहाची दारू घेतली होती. काही वेळातच प्रत्येकाची तब्येत ढासळण्यास सुरवात झाली आणि एकामागून एक सातजण मरण पावले. उरलेले पाचही अत्यवस्थ आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या गावातील तरुण खोकल्यावरील एक हमियोपॅथीचे औषध पित असत. त्यांना कुणीतरी सांगितलेले की ते औषध मोहाच्या दारुसोबत प्यालं की कोरोनापासून बचाव होतो. त्या गैरसमजातून गेले काही दिवस गावातील अनेकांमध्ये या वेगळ्या कॉकटेलची सवय वाढली होती. मंगळवारी रात्री कोरोनापासून बचावासाठी या कुटुंबातील बाराही जणांनी तेच मिश्रण प्याले असणार, अशी शक्यता आहे.

मृतांपैकी चौघांचे अंत्यसंस्कार रात्रीच्या वेळी करण्यात आले. त्यामुळे हि बाब संशयास्पद बनली आहे. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ते जे औषध ते प्यायले त्यात अल्कोहोल चे प्रमाण खूप जास्त असते. ते बाधले असणार अशी शक्यता आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

मुंबई उच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंतरिम दिलासा नाकारला

रेमडेसिवीर गरीबांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Comments are closed.