Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

…अखेर श्वेता हॉस्पिटल कोविड सेंटरची मान्यता रद्द; कोव्हीड रुग्णांकडून जादा दर आकारणे चांगलेच भोवले

कोव्हीड रुग्णांशी जादा दर आकारून वाद करण्याचा व्हायरल व्हिडिओने शिकविला धडा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : शासनाने ठरविलेल्या दरांपेक्षा अधिक दर आकारणी करून कोविड रुग्णांची आर्थिक लूट करीत असलेल्या चंद्रपूर शहरातील डॉ. रितेश दीक्षित यांचे श्वेता हॉस्पिटलच्या कोविड केअर सेंटरची मान्यता परवानगी गुरुवारी मनपा प्रशासनाने रद्द केली असल्याने अन्य शहरातील वैद्यकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यात चंद्रपूर जिल्हातही कोरोनाचा प्रादुर्भावात झपाट्याने वाढ होत आहे.  शहरापासून गावाखेड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे शासनानी रुग्णांना वेळेत उपचार मिळावा याकरिता खाजगी रुग्णालयाला शासनानी दर ठरवून कोविड सेंटर निर्माण करण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी खाजगी रुग्णालयांना कोरोना उपचार करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार श्वेता हॉस्पिटलला सुद्धा कोविड सेंटरची परवानगी देण्यात आली होती. डॉ. रितेश दीक्षित हे कोविड रुग्णांवर उपचार करीत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Shweta Hospital Pharmacy

काही दिवसांपूर्वी श्वेता हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांकडून शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक दर  घेण्यात येत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर वायरल झाला असता त्यावेळी जिल्ह्यात सर्वत्र टिकेची झोड उठली होती. त्यानंतर श्वेता हॉस्पिटलमध्ये डॉ. रितेश दीक्षित आणि रुग्णांच्या नातेवाईकांत झालेली खडाजंगी ही वायरल झाली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या सर्व प्रकाराची मनपा प्रशासनाने गंभीरतेने दखल घेत श्वेता हॉस्पिटलची परवानगी रद्द करण्यात आल्याचे यासंबंधिचे पत्र हॉस्पिटल ला पाठविण्यात आले असल्याचे मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे यांनी सांगितले.

 

हे देखील वाचा : 

हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित

माहिला-बालकांच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देणार

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.