Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चवताळलेल्या हत्तीचा दोघांवर हल्ला; मुख्यलेखापाल ठार तर सहाय्यक वनसंरक्षक थोडक्यात बचावले!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : जगप्रसिध्द असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी परिसरात असलेल्या हत्तीने अचानक सायंकाळी ८.०० वाजताच्या सुमारास गजराज नावाचा चवताळलेल्या हत्तीने दोघांवर हल्ला केला, यात मुख्यलेखापाल यांचा मृत्यू झाला तर सहाय्यक वनसंरक्षक स्वतःला सावरल्याने थोडक्यात बचावले.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सहाय्यक वनसंरक्षक रवींद्र कुलकर्णी आणि मुख्यालेखापाल प्रमोद गौरकर बोटेझरी परिसरात वाहनाने जात होते. मात्र दोन दिवसा अगोदर झालेल्या पावसामुळे रस्त्यावर चिखल निर्माण झाले होते. आणि याच ठिकाणी वाहन फसल्याने जागेवरच होते. बोटेझरी येथील असलेल्या गजराज नावाचा हत्ती अचानक आक्रमक चवताळला असल्याची माहिती नसल्याने त्याच ठिकाणी दोघांचीही फसगत झाली आणि जवळच असलेल्या गजराज हत्तीने अचानक हल्ला केल्याने यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मुख्यलेखापाल प्रमोद गौरकर यांचा मृत्यू झाला तर सहाय्यक वनसंरक्षक रवींद्र कुलकर्णी थोडक्यात बचावले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांना होताच घटनास्थळी रॅपिड रिस्पॉन्स टीम’, पशुवैद्यकीय पथक आणि ताडोबाचे अधिकारी दाखल झाले. गजराज नावाचा हत्ती आक्रमक असल्याने त्याला शांत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या आधीही एका महावताला ठार केल्याची घटना घडली असल्याने बोटेझरी परिसरालगत असलेल्या गावातील नागरिकांना हत्तीपासून सतर्क राहणाच्या सूचना देण्यात आले आहे. शिवाय हत्ती पुन्हा आक्रमक चवताळू नये यासाठी वनकर्मचा-यांमार्फत कसोशीचे प्रयत्न चालू असून पुनश्चः अनुचित प्रकार घडणार नाही याचीही घबरदारी घेत आहे.

ताडोबा अंधारी व्याघ प्रकल्पातील बोटेझरी छावणीत गजराज नावाचा हत्तीवर बाहेरून येणारे पर्यटक गजराजावर बसून शाही सवारी करीत पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतात. सध्या कोव्हीड-१९ मुळे राज्यभरात लाकडाऊन करण्यात आल्याने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सर्व सोयी बंद आहेत. अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वन संरक्षक आणि क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

…अखेर श्वेता हॉस्पिटल कोविड सेंटरची मान्यता रद्द; कोव्हीड रुग्णांकडून जादा दर आकारणे चांगलेच भोवले

सावधान ! डॉक्टरांना न विचारता कोरोनासाठी औषधी घेऊ नका! एकाच कुटुंबात ८ मृत्यू, ५ अत्यवस्थ!!

Comments are closed.