Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धुळ्यात १ कोटी ३७ लाखांचा गुटखा जप्त, तीन संशयित ताब्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

धुळे : परराज्यातून महाराष्ट्रात विक्रीसाठी येणारा १ कोटी ३७ लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या धुळे पथकाने जप्त केला असून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या वतीने धुळे शहरालगत सुरत बायपास रस्त्यावर तिन आयचेर वाहनांमधून तब्बल १ कोटी ३७ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे एम. एच. ४८ बी. एन ३७१७ व एमएच ४८ ए.जी. ३७११ आणि एम.एच. ४८ ए.वाय ३९२९ क्रमांकाच्या आयचेर मधून १ कोटी ३७ लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी महेंद्र रामनवल तिवारी वय ४०, प्रमोद जटाशंकर उपाध्याय वय ३५ व गोवर्धन जंगीलाल गौड या तिन संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर कारवाई पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी, योगेश राउत, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप थोरात, सुनिल विंचुरकर, रफीक पठाण, महेंद्र कापुरे, संजय पाटील, संदीप पाटील, रंविद्र माळी, संतोष हिरे, संदिप सरग, प्रकाश सोनार, अशोक पाटील, गौतम सपकाळे, हेमंत सोनवणे, मनोज पाटील, चेतन कंखरे, उमेश पवार, विशाल पाटील, राहुल सानप, रवि राठोड, मनोज बागुल, महेश मराठे, तुषार पाटील, श्रीशैल जाधव, सागर शिर्के, योगेश जगताप, किशोर पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

ऑईल इंडियामध्ये ११९ जागांवर नौकरीची संधी

डीआरडीओमध्ये ७९ पदांवर संधी

Comments are closed.