Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लॉकडाऊनचे नियम तोडून विवाह करणाऱ्या वधु पित्यावर ५० हजार रुपयाचा दंड

नगर परिषद आरमोरी व तहसील कार्यालय आरमोरी ची संयुक्त कार्यवाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी :  कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी शासन प्रशासनाने जारी केलेल्या नियमाचे उल्लंघन करून विवाह करणाऱ्या आरमोरी येथील वधू पित्याकडून ५० हजाराचा दंड आकारण्यात आला आहे. सदर कार्यवाही तहसील कार्यालय व नगरपरिषदच्या वतीने गुरुवारी संयुक्तरित्या करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आरमोरी शास्त्रीनगर बि. एस. एन. एल. टॉवर जवळील संतोषसिंग रंजितसिंग जुनी यांच्या मुलीचा आज विवाह होता. या विवाहात २०० पेक्षा अधिक लोक विवाह कार्यक्रमात उपस्थित होते. अशी माहिती मिळताच आरमोरी नगर परिषद व तहसील कार्यालय आरमोरी यांच्या संयुक्त पथकाने विवाह स्थळी जाऊन पाहणी करून मौका चौकशी केली असता सदर विवाहात २०० पेक्षा अधिक लोक आढळुन आले.

संतोषसिंग जुनी यांनी लॉकडाऊनचे नियम तोडून विवाह करीत असल्यामुळे त्यांच्यावर ५० हजार रुपयाचा दंड आकारण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर कार्यवाही नायब तहसीलदार संजय राठोड, नगरपरिषदच्या मुख्याधिकारी, डॉ. माधुरी सलामे, स्वच्छता व पाणी पुरवठा अभियंता नितीन गौरखेडे, तलाठी पी. जी. गजभिये तहसील कार्यालयाचे महसूल सहाय्यक, संदीप तुपट, प्रशांत भैसारे, नगरपरिषदचे कर्मचारी राजु कांबळे, मोहन कांबळे, सुधीर सेलोकर, मंगेश चिचघरे इत्यादींच्या उपस्थितीत कार्यवाही करण्यात आली.

हे देखील वाचा :

अवैध बोगस बी.टी. बियाणे जप्त करुन गुन्हा दाखल

 

यंदा खरीपाचे १५७ लाख हेक्टर क्षेत्रावर नियोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.