Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अवैध बोगस बी.टी. बियाणे जप्त करुन गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २० मे : चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर येथे बोगस शासन प्रतिबंधित एच.टी.बी.टी.कापूस बियाणे विक्री करत असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार सदर ठिकाणी पोलीस स्टेशन आष्टी,पोलीस उपनिरीक्षक जंगले यांच्या मदतीने जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम, मोहीम अधिकारी के.जी.दोनाडकर, कृषी अधिकारी चामोर्शी वसंत वळवी यांनी छापा टाकून बोगस बियाणे विक्री करत असलेल्या राहत्या घरी एकूण १०४ कापूस पॅकेट जप्ती केले व संबंधित विक्रेत्यावर जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम यांच्या लेखी फिर्यादीवरून पोलीस स्टेशन आष्टी येथे काल रात्री.१०.०० वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाद्वारे जिल्ह्यात कापूस घेण्यात येणाऱ्या पट्टयात कृषी केंद्राच्या तसेच संशयित गोदामांच्या ठिकाणी तपासण्या सुरु आहेत. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे एच.टी.बी.टी. बियाणे लागवड करू नये, शासन मान्यताप्राप्त वाणांचीच लागवड करावी असे आव्हान कृषी विभागाने केले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

जिल्हयात लसीकरणासाठी प्रशासनाची नाविण्यपुर्ण रणनीती

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.