Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

व्यसन हे आरोग्यासाठी धोकादायक – नीलम हरिणखेडे

बार्टी चा अभिनव उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २० मे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे जिल्हा कार्यालय गडचिरोलीच्या वतीने व्यसनमुक्ती या विषयावर झूम अँपच्या माध्यमातून ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक गोळा करून कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने संपूर्ण महाराष्ट्र समतादूत प्रकल्पांतर्गत विविध विषयावर ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

 

समतादूत प्रकल्प गडचिरोलीच्या वतीने नीलम हरिनखेडे मॅडम मुक्तीपथ अभियान तालुका संघटक व मनीष गणवीर प्रकल्प अधिकारी बार्टी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात आला. दारू पिणे, सिगारेट ओढणे, खर्रा खाणे इत्यादी मुळे दात, घसा, फुफ्फुसे, हृदय, जठर, श्वसनसंस्था, पचनसंस्था यावर परिणाम होऊन कर्करोग व इतर भयंकर रोग होतात, व्यसनाने माणसाच्या जीवनावर मानसिक शारीरिक आर्थिक अशा विविध प्रकारचे दुष्परिणाम होतात व परिणामी त्यांचे कुटुंब उध्वस्त होतात. असे  हरिनखेडे मॅडम यांनी गोष्टीच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व बार्टी मार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम याविषयी प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर यांनी माहिती दिली तर कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांचे आभार समतादूत सचिन फुलझेले यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता समतादुत वंदना धोंगडे,  होमराज कवडो, जयलाल सिंदराम यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमात जिल्ह्यातील तसेच बाहेर जिल्ह्यातील समतादूत  व नागरिक उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्हयात लसीकरणासाठी प्रशासनाची नाविण्यपुर्ण रणनीती

सलग दुसऱ्या वर्षी आशिया कप स्पर्धेचं आयोजन रद्द

Comments are closed.