Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सलग दुसऱ्या वर्षी आशिया कप स्पर्धेचं आयोजन रद्द

जून महिन्यात आशिया कपचं श्रीलंकेत आयोजन करण्यात आलं होतं. सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

Asia Cup 2021 : कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. अशातच कोरोनाचा क्रिकेटलाही मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक क्रिकेटच्या स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. सलग दुसऱ्या वर्षी कोरोना महामारीमुळे आशिया कप टी20 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डनं यासंदर्भात माहिती दिली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डनं सांगितलं की, सध्याची कोरोना परिस्थिती पाहता आशिया कप स्पर्धेचं आयोजन रद्द करण्यात आलं आहे. श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी एश्ले डी सिल्वा यांनी सांगितलं की, “सध्याची परिस्थिती पाहता, यंदाच्या वर्षी जूनमध्ये होणारी आशियाई कप स्पर्धा खेळवणं शक्य नाही.”

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ही स्पर्धा सप्टेंबर 2020 मध्ये खेळवण्यात येणार होती. गेल्यावर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. त्यावेळी ही स्पर्धा जून 2021 मध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान कोरोनाचा संसर्ग पाहता ही स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. अशातच ही स्पर्धा पुढल्या वर्षी खेळवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप यासंदर्भात आशिया क्रिकेट संघटनाच्या वतीनं अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही.

हे पण वाचा :- ICMRचा महत्त्वाचा निर्णय ; आता घरच्या घरी कोरोना अँटिजेन टेस्ट करता येणार

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.