Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकऱ्यांनी अनधिकृत एच टी बी टी बियाणे खरेदी करू नये

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांचे आवाहन..

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली,दि.१०: शेतकऱ्यांनी खरीप हंगामात लागवडीसाठी एचटीबीटी (चोर बीटी) बियाणे खरेदी करू नये असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे. जिल्ह्यातील सध्या बाजारात बोगस बियाणे खाजगी व्यक्ती मार्फत छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे. या अवैध बियाण्यांना शासनाची कोणतीही कोणतीही मान्यता नाही. अश्या प्रकारचे बियाणे विक्री करणे, बाळगणे, साठा करणे गुन्हा आहे. या प्रकारचे लागवड केलेल्या कापूस पिकाची पाने व कापसाचे नमुने तपसणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे. यात एच टी बी टी आढळून आल्यास संबंधितावर कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर एचटीबीटी लागवड केल्याने जामिनाचा ऱ्हास होऊन जमिनी कालंतराने नापीक होतात. मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतो. तरी शेतकऱ्यांनी अधिकृत कापूस बियाणे लागवड करावे.
एखाद्या व्यक्तीकडे अनधिकृत एच टी बियाणे आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात येईल. एचटीबीटी बियाणे विक्री करणाऱ्या लोकांवर कृषी विभाग लक्ष ठेवून असून टीम ACTIVE केली असून आष्टी परिसर व आजूबाजूच्या परिसरात कृषी विभाग स्वत: लक्ष देऊन आहेत. शक्य तीथे पोलीस विभागाची मदत घेतली जात आहे. असे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गडचिरोली, संजय मेश्राम यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा,

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोष

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बियाणे-खते-कीटकनाशक संबंधित अडचणी सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन

‘सर्च’रुग्णालयात विविध आजारावर होणार तपासणी

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.