Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

निमलगुडम रस्त्याची दुर्दशा कायम…

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • डांबरीकरण पूर्णतः उखडले..
  • गेल्या पंधरा वर्षापुर्वी डांबरीकरण करण्यात आले…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गुड्डीगुडम : अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय तिमरमच्या हद्दीतील निमलगुडम येथे १५ वर्षापूर्वी गावातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. सद्या येथील डांबरीकरण उखडून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. रस्ता निर्मितीच्या १५ वर्षानंतर एकदाही सदर रस्त्याची दुरुस्ती न केल्याने नागरिकांकडून शासनाप्रति नाराजी व्यक्त केली जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

निमलगुडम येथे जाण्यास एकमेव मार्ग आहे. येथूनच नागरिकांचे आवागमन सुरू असते. रस्त्याची दुरवस्था झाल्याने येथून ये-जा करणार्‍या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच गुड्डीगुडम येतील शेतकरी बांधव सुद्धा याच मार्गाने आपल्याला शेतात जाण्यास अवलंब करतात. म्हणून पावसाळ्यात मात्र या रस्त्याला नेहमीच वर्दळ असते. म्हणून या मार्गाचे पावसाळापूर्वी डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी गावातील नागरिकांकडून केली जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

‘स्पुटनिक-व्ही’ लसीची ऑगस्टपासून भारतात निर्मिती

गाव सोडलेली पोरंच कोरोनारुपी संकटकाळात गावासाठी आली धावून

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.