Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार अटकेत; हत्येच्या गुन्ह्यात फरार होता

माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर धनखडच्या मृत्यू प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप सुशील कुमारवर आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली 23 मे:- ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. अखेर सुशील कुमार ला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं ही कारवाई केली. सुशील आणि आरोपी अजयला दिल्लीतील मुंडका परिसरातून अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर धनखडच्या मृत्यू प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप सुशील कुमारवर आहे. सुशील कुमारवर एक लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. सुशील कुमार परदेशात पसार झाला असावा असा संशय पोलिसांना होता. याच पार्श्वभूमीवर देशाच्या सर्व विमानतळांवर सुशील संदर्भात माहिती देण्यात आली होती.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “पोलीस निरीक्षक शिवकुमार, पोलीस निरीक्षक करमवीर आणि एसीपी अत्तर सिंह यांच्या नेतृत्त्वात स्पेशल सेलनं सुशील कुमार आणि अजयला दिल्लीतील मुंडका परिसरातून अटक केली.”

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ज्युनिअर नॅशनल चॅम्पीयनशीप स्पर्धा विजेत्या कुस्तीपटूच्या हत्या प्रकरणात कुस्तीपटू सुशील कुमार आरोपी आहे. या प्रकरणात पोलिसांनी सुशीलसह आणखी दोन कुस्तीपटूंच्या घरावर धाड टाकली होती. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीपटूंच्या दोन गटामध्ये मारामारी झाली. यामध्ये 23 वर्षांच्या एका कुस्तीपटूचा मृत्यू झाला.

मारहाणीचा व्हिडीओही पोलिसांच्या हाती लागला आहे. ज्या दिवशी हत्या झाली, त्याच रात्री पोलिसांनी यामध्ये सहभागी असलेला एक आरोपी प्रिन्स दलालला अटक केली होती. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी आणखी दहा आरोपींची ओळख पटवली होती. परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.