Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दोन रेल्वे एकाच ट्रॅकवर सुसाट वेगाने, भीषण धडकेत ३० प्रवाशांचा मृत्यू

मिल्लत एक्स्प्रेस (Millat Express) आणि सर सय्यद एक्स्प्रेस (Sir Sayyed Express) या दोन रेल्वे एकाच ट्रॅकवर आल्याने त्यांची भीषण धडक झाली. यामध्ये आतापर्यंत 30 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था : पाकिस्तानात आज सकाळी भीषण रेल्वे दुर्घटना घडली. दोन ट्रेनची समोरासमोर धडक झाल्याने तब्बल ३० प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत. सिंध प्रांतातील डहारकीजवळ ही भीषण दुर्घटना घडली. मिल्लत एक्स्प्रेस आणि सर सय्यद एक्स्प्रेस या दोन रेल्वे एकाच ट्रॅकवर आल्याने त्यांची भीषण धडक झाली. प्राथमिक माहितीनुसार यामध्ये आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अनेक लोक अजूनही रेल्वे बोगीत अडकले आहेत.

नेमकं काय घडलं?

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पाकिस्तानी वृत्तवाहिनी जियो टीव्हीनुसार, मिल्लत एक्स्प्रेस अनियंत्रित झाल्याने तिचे डबे दुसऱ्या रेल्वे ट्रॅकवर गेले. त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवरुन सय्यद एक्स्प्रेस जात होती. त्यावेळी ही भीषण धडक झाली. या अपघातात मिल्लत एक्स्प्रेसचे ८ आणि सय्यद एक्स्प्रेसच्या इंजिनसह चार डबे ट्रॅकवरुन उतरले. या अपघातात जवळपास ५० प्रवासी गंभीर जखमी आहेत.

मिल्लत एक्स्प्रेस कराचीवरुन सरगोधाला तर सय्यद एक्स्प्रेस रावळपिंडीवरुन कराचीला जात होती. त्यादरम्यान पहाटे 3 वाजून ४५ मिनिटांनी हा अपघात झाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान, या अपघाताच्या तब्बल चार तास उलटूनही पाकिस्तानी अधिकारी घटनास्थळी पोहोचलेच नाही. त्यामुळे मदत आणि बचावकार्यही सुरु झालं नसल्याने, अनेक जखमी प्रवाशांचा तडफडून मृत्यू झाला.

अनेक प्रवासी असे काही अडकले आहेत की ट्रेनचे डबे कापून त्यांना बाहेर काढण्याशिवाय पर्याय नाही. जे प्रवासी जखमी आहेत, त्यांना ट्रॅक्टर ट्रॉलीत भरुन उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं.

हे देखील वाचा :

मोठी बातमी : भारतात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट; संसर्ग झाल्यानंतर ७ दिवसांत घटू शकतं वजन, संशोधकांची माहिती

धक्कादायक!! पतीच्या सततच्या छळाला कंटाळून पत्नीने केली आत्महत्या!

महाराष्ट्र आजपासून अनलॉक, तुमच्या जिल्ह्यात/शहरात कोणते निर्बंध शिथिल?

Comments are closed.