Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्ह्यात खेरवाड़ी संस्थे मार्फत सेंद्रिय शेती कडे मोठे पाऊल

संस्था लाभार्थीना प्रशिक्षण सोबत वर्मीबेड व गांडुळ उपलब्ध करून देत आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली ०७ जून :-  संपूर्ण जिल्ह्यात खेरवाड़ी सोशल वेलफेर असोसिएशन (युवा परिवर्तन) मार्फत २०१८ पासून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात नगर परिषद व नगर पंचायत तसेच लागत चे गावात CSR च्या  मार्फत मोठ्या गांडुळ खताचे प्रकल्प चालू आहे. यात संस्था लाभार्थीना प्रशिक्षण सोबत वर्मीबेड व गांडुळ उपलब्ध करून देत आहे. इतकेच नसून वारंवार संस्थचे कार्यकर्ते त्यांचे निरीक्षण सुरळित चालण्यासाठी मदत देखील करीत आहेत.

agriculture2

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक विलास कांवळे सांगतात संस्था वर्मी प्रकल्पच नाही तर सेंद्रिय शेती करिता व इतर शेतकऱ्यांना विविध पद्धतिचे प्रशिक्षण देखील दिले जात आहे. त्यात सेंद्रिय कीटकनाशक, पारसबाग, रोपवाटिका, श्री पध्दत भात लागवाट, दुय्यम पीक लागवट इत्यादि.

अशा प्रकारे संस्था गेल्या ३ वर्षापासून ५५० पेक्षा अधिक लाभार्थी गांडूळखत प्रकल्पामध्ये जोड़ले आहे. विशेष म्हणजे यात महिला व बचत गट समावेश आहेत यामुळे लाभार्थ्यांचे  आर्थिक दृष्टीने वृध्दी होतच आहे. सोबत त्यांची वाटचाल ही सेंद्रिय शेतीकडे वळण घेत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

धक्कादायक!! पतीच्या सततच्या छळाला कंटाळून पत्नीने केली आत्महत्या!

मोठी बातमी : भारतात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट; संसर्ग झाल्यानंतर ७ दिवसांत घटू शकतं वजन, संशोधकांची माहिती

 

Comments are closed.