Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबईसह उपनगरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

दक्षिण-पश्चिम मान्सून आज मुंबईत दाखल होऊ शकतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 09 जून : आज मान्सूनची मुंबईमध्ये एन्ट्री होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मान्सूननं मुंबईत प्रवेश केला की, नाही, हे जरी जाहीर झालेलं नसलं तरी रात्रीपासूनच पावसानं मुंबईत हजेरी लावली आहे. मुंबईला रात्रभर पावसानं चांगलंच झोडपलं आहे. अद्यापही हा पाऊस मुंबईच्या अनेक भागांत बरसतोय. मुंबईतील पश्चिम उपनगरं म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस बरसतोय. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु असून अधूनमधून जोरदार सरीही कोसळत आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि लगतच्या परिसरात मंगळवारी सकाळी पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत पावसानं हजेरी लावली आहे. अशातच भारतीय हवामान विभाग (IMD)नं मात्र हा मान्सूनचा पाऊस नसून मान्सूनपूर्व पाऊस असल्याचं सांगितलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. थोड्याचवेळात समुद्रालाही मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस असाच सुरु राहिल्यास या भागांमध्ये आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. सायनमध्ये अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. शहर आणि उपनगराच्या परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसत आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता.

या मुसळधार पावसाचा लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सायन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. पहिल्याच पावसात मुंबतील सखल भागासह अनेक रेल्वे स्थानकांमध्येही पाणी भरलं आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळ ट्रॅक पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.